नदीकाठी लोकांचे  सुरू झाले स्थलांतर ः कुठे पहा 

images.jpg
images.jpg
Updated on

इटकरे (सांगली) ः मान्सुनच्या पहिल्या सलामीतच कृष्णा आणि वारणाकाठ सावध झाला आहे. कृष्णा वारणेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाची वाटचाल लक्षात घेत या वर्षीही महापुर येण्याची शक्‍यता गृहीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आतापासूनच नदीकाठावरील लोक स्थलांतरी होत आहेत.

नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. जनावरांसाठी टेकाडावर शेड, कुटुंबियांसाठी सुरक्षित पर्यायायाची व्यवस्था किंवा महापुरापासून सुरक्षित असणाऱ्या इस्लामपूर शहरातील पै-पाहुण्यांकडे नियोजन अशा चाचपण्या सुरु झाल्या आहेत. 

कृष्णा आणि वारणा नदीकाठाला पुर आणि महापूर नवा नाही. गेल्या वर्षापर्यंत नदीकाठावरील ग्रामस्थांना पुराचा अंदाज होता. पावसाच्या वाटचालीवरुन पुराचा धोका लक्षात यायचा. त्यानुसार हालचाली गतीमान होत. मात्र मागील वर्षी पावसाने आणि महापुराने सर्वांचे अंदाज फोल ठरवले. वयाची नव्वदी गाठलेल्यांनीही पाहिला नव्हता असा महापुर 2019 मध्ये आला.

आपल्या उंबऱ्यापर्यंत पाणी यायचे नाही असे म्हणणाऱ्यांची घरे देखील छत न दिसण्याइतपत बुडाली होती. यावर्षी मान्सुनने वेळेत हजेरी लावली आहे. शिराळा पट्ट्यात आणि धरण क्षेत्रात पावसाने चांगलीच बॅटींग सुरु केली आहे.

त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात आत्तापासूनच वाढ सुरु झाली आहे. धरणासह पुलावरील पाणी पातळीचे आकडे आत्ताच सोशल मिडीयातून फिरत आहेत. त्यामुळे नदीकाठ धास्तावला आहे. ग्रामस्थांनी महापूर गृहीत धरुन आत्तापासूनच उपाययोजनांची चाचपणी सुरु केली आहे. 

कृष्णा, वारणा काठमधील गावे 
वारणा काठावर चिकुर्डे, तांदूळवाडी, कुंडलवाडी, कणेगाव, भरतवाडी, बागणी, शिगाव तर कृष्णा काठावर बहे, नरसिंहपूर, शिरटे, बोरगाव, रेठरेहरणाक्ष, फार्णेवाडी, बनेवाडी, साटपेपाडी, गौंडवाडी, नवेखेड, जुनेखेड, मसुचीवाडी, ताकारी, वाळवा, मर्दवाडी, कारंदवाडी (हाळ भाग) यासह अन्य लहानमोठी गावे पुराच्या कक्षेत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शहरातून गावाकडे मोठ्या संख्येने लोक आले. आता महापुर आल्यास गावातून पुन्हा सुरक्षित असणाऱ्या शहराकडे लोकांची वाटचाल असेल. 
-------- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com